आसाममध्ये वर्ष २०३८ पर्यंत मुसलमान बहुसंख्यांक होतील !
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार जयंत बरुआ यांना भीती
असे होऊ नये, याचे दायित्व हिंदूंनी भाजपला दिले असल्याने राष्ट्रीय स्तरावरच लोकसंख्या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा, धर्मांतरविरोधी कायदा आदी कायदे तात्काळ संमत करून ते लागू केले पाहिजेत !
गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीचा सध्याचा दर असाच कायम राहिला, तर वर्ष २०३८ पर्यंत आसाममध्ये हिंदु अल्पसंख्यांक होतील, तर मुसलमान बहुसंख्यांक होतील, अशी भीती आसाममधील भाजपचे आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष जयंत मल्ला बरुआ यांनी व्यक्त केली आहे.
2038 तक मियाँ-मुस्लिम होंगे बहुसंख्यक, हिंदुओं के मुकाबले ट्रिपल रेट से बढ़ रही आबादी: असम CM के पॉलिटिकल सेक्रेटरी ने चेताया#Assam #Muslims #populationcontrollaw https://t.co/eaddARoJXL
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 16, 2021
बरुआ यांनी राज्यातील लोकसंख्येविषयी मांडलेली सूत्रे
१. वर्ष १९९१-२००१ या काळात आसाममध्ये हिंदूंची लोकसंख्या १४.९ टक्क्यांनी वाढली होती, तर मुसलमानांची २९.३ टक्क्यांनी वाढली. थोडक्यात या दशकात हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीचा वेग दुप्पट होता.
२. वर्ष २००१-२०११ या दशकात हिंदू १०.९ टक्के, तर मुसलमान २९.६ टक्क्यांच्या वेगाने वाढले. याचा अर्थ हिंदूंच्या तुलनेत ही वाढ तिप्पट होती. एकूणच हिंदूंच्या लोकसंख्येची गती पूर्वीच्या दशकापेक्षा अल्प झाली, तर मुसलमानांची वाढली.
३. जनगणनेच्या अहवालानुसार वर्ष १९७१ मध्ये आसामच्या लोकसंख्येमध्ये हिंदू ७१.५१ टक्के, तर मुसलमान २४.५६ टक्के होते; मात्र वर्ष २०११ मध्ये हिंदू ६१.४६ टक्के, तर मुसलमान ३४.२२ टक्के झाले. म्हणजेच हिंदूंची लोकसंख्या अल्प होऊन मुसलमानांची वाढली.
४. वर्ष १९७१ मध्ये आसाममध्ये दोनच जिल्हे मुसलमानबहुल होते; मात्र वर्ष २०११ मध्ये ही संख्या ११ झाली आहे.