आध्यात्मिक मित्रांना घेतले परात्पर गुरु डॉक्टरांनी चरणांशी ।
प्रत्येक साधकावर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
श्री. तुकाराम लोंढे यांच्याशी माझी आध्यात्मिक मैत्री परात्पर गुरुदेवांनी लावून दिली. गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादामुळे मागील २५ वर्षे ती टिकून आहे. ती कशी आहे ? याविषयी गुरुमाऊलीने स्फूर्ती देऊन, त्याविषयी काव्य सुचवून लिहून घेतले. ते त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.
तुकाराम मित्र माझे
गेले हो रामनाथी (टीप १) ।
परम पूज्य (टीप २)
त्यांची विचारपूस करती ।
ते स्वतःविषयी न सांगता
मित्राविषयी सांगती ।। १ ।।
परम पूज्य म्हणती त्यांची काळजी नको आता ।
तुमचे काय चालले आहे,
ते आधी सांगा ।
तुकाराम पुन्हा वटकरकाकांच्या प्रगतीविषयी विचारती ।। २ ।।
मित्राचा भाव पाहूनी, परम पूज्य जाती आनंदुनी ।
‘मित्र असावे ऐसे’ असे साधकांना सांगती ।
तेव्हा तुकाराम जाती भावावस्थेशी ।
दोन्ही मित्रांना घेतले परम पूज्यांनी चरणांशी ।। ३ ।।
दोघा मित्रांच्या अनंत अडचणी असूनी ।
गुरुकृपेने कठीण प्रारब्धावर मात करूनी ।
परम पूज्यांच्या चरणी सर्व भार टाकूनी ।
आनंदी रहाती दोघेही गुरुमाऊलीच्या चरणी ।। ४ ।।
गुरुकृपेचे छत्र असे हो त्या दोघांच्या शिरी ।
दोघेही म्हणती आमचा देव वसतसे रामनाथी ।
परम पूज्यांच्या गुरुपादुका ठेवल्या
त्यांनी हृदय सिंहासनी ।। ५ ।।
स्वातंत्र्य देऊनी घरच्यांनी साधनेसाठी साहाय्य केले ।
समाजाने त्यागले, मायेतील लोकांनी फसवले ।
सर्वांनी भंगार म्हणून सोडून दिले ।। ६ ।।
परम पूज्यांनी दोन्ही भंगारांना ठेवले हो चरणांसी ।
व्यष्टी आणि समष्टी करवूनी घेतली त्या दोघांकडूनी ।
आध्यात्मिक प्रगती करवून
भंगाराचे सोने केले हो परम पूज्यांनी ।। ७ ।।
जन्मोजन्माचे कल्याण केले हो परम पूज्यांनी ।
या ऋणांनी दोघेही मित्र गेले भारावूनी ।
चरणांजवळ राहू द्या प्रार्थना करती
गुरुमाऊलीच्या चरणी ।। ८ ।।
टीप १ – सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
टीप २ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.७.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |