शिवसेना आमदारांकडून कंत्राटदारावर कचरा फेकून संताप व्यक्त !
मुंबई – वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदाराने रस्त्याची स्वच्छता न केल्याने चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या अंगावर कचरा फेकून संताप व्यक्त केला. ‘१५ दिवसांपासून मी कंत्राटदाराकडे स्वच्छतेची विनंती करत होतो’, असे लांडे यांनी सांगितले.