(म्हणे) ‘पत्रकार गिरीश कुबेर यांचे पुस्तक म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार !’
संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांची ब्राह्मणद्वेषी गरळओक
असे विधान करणे म्हणजे जाणूनबुजून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उकरून काढणेच नव्हे का ?
सातारा – पत्रकार गिरीश कुबेर यांचे ‘रेनिसान्स स्टेट’ हे पुस्तक म्हणजे पुरंदरेंचा (शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा) इंग्रजी अवतार असल्याची ब्राह्मणद्वेषी गरळओक संभाजी ब्रिगेड संघटनेचे श्रीमंत कोकाटे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केली. (गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकाशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा कोणताही संबंध नसतांना केवळ ब्राह्मण द्वेषापोटी कोकाटे यांनी हे विधान केले आहे, असा याचा अर्थ होत नाही का ? – संपादक) राज्यशासनाने या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.
कोकाटे पुढे म्हणाले की, या पुस्तकातील कुबेर यांनी केलेली मांडणी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची अपकीर्ती करणारी आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून ते सनातनी व्यवस्थेला देणे, हा त्यांचा उद्देश आहे.