‘सनातन पंचांग’ सनातन शॉपद्वारे विदेशात पाठवता येत नसल्याने इंग्लंडमधील एका जिज्ञासूने ते तिकडे छापून घेण्याची सिद्धता दर्शवणे
सनातन संस्थेच्या अमूल्य चैतन्यमय साहित्याचे विदेशातील जिज्ञासूंना असलेले मोल !
‘इंग्लंड येथील एका जिज्ञासूला ‘सनातन पंचांग’ पाहिजे होते. तेव्हा मी त्यांना ‘सनातन शॉपवरून विदेशात प्रसारसाहित्य पाठवले जात नाही. ते केवळ भारतापुरते मर्यादित आहे’, असे सांगितले. नंतर पुन्हा त्यांचे संगणकीय पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘माझे वडील ८७ वर्षांचे आहेत. त्यांना सनातन पंचांग हवेच आहे. तुम्ही मला पंचांगाची पी.डी.एफ्. पाठवाल का ? म्हणजे मी येथून छपाई करून घेईन.’
त्यांनी लिहिलेले लिखाण वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेल्या प्रत्येक वस्तूतील चैतन्याची विशालता लक्षात आली. या सर्व चैतन्यमय वस्तू अमूल्य आहेत. भारतातील साधक आणि जिज्ञासू यांना सात्त्विक उत्पादने सहजतेने उपलब्ध होतात. त्यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. शशिकला आचार्य, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१.२०२१)