इस्रायलकडून गाझा शहरावर प्रत्युत्तरादाखल आक्रमण
‘हमास’चे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा
तेल अवीव (इस्रायल) – गाझापट्टीमधून आग लावण्यात येणारे फुगे इस्रायलमध्ये सोडण्यात आल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी १६ जूनच्या पहाटे गाझापट्टीवर एअर स्ट्राईक केले. इस्रायलमध्ये नवीन सरकार आल्यानंतर गाझापट्टीवर झालेले हे पहिलेच आक्रमण आहे. पॅलेस्टाईनमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘हमास’समवेत काही आठवड्यांपूर्वीच शस्त्रसंधी करण्यात आली होती. त्यानंतर आक्रमणाची ही पहिलीच घटना आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी खान युनिस आणि गाझा या शहरांत हमासच्या तळांवर हे आक्रमण केले. या ठिकाणांहून हमासच्या कारवाया चालू होत्या.
Israeli air strikes hit Gaza, after Palestinian militants sent incendiary balloons into Israel https://t.co/rwyXpUc1Bd
— BBC Breaking News (@BBCBreaking) June 15, 2021