बेतिया (बिहार) येथे अज्ञातांकडून रामजानकी मंदिरातील मूर्तींची तोडफोड !

संतप्त गावकर्‍यांकडून रस्ताबंद आंदोलन !

देशात हिंदूंच्या मंदिरांत होणार्‍या अशा तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

रामजानकी मंदिरातील भग्न मूर्ती

चंपारण (बिहार) – येथील रामजानकी मंदिरात अज्ञातांनी मूर्तींची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यामुळे संतप्त गावकर्‍यांनी येथे रस्ताबंद आंदोलन केले. पोलिसांनी समजावल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, मंदिराच्या जवळपास मद्यपी आणि जुगारी यांचे अड्डे आहेत. त्यांच्याकडून ही घटना झाल्याची शक्यता आहे. पोलिसांना हे अड्डे ठाऊक असूनही ते मूकदर्शक बनले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. (गावकर्‍यांनी याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे केली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई होण्याचा पाठपुरावा केला पाहिजे ! – संपादक) मंदिराच्या पुजार्‍यांनी आरोप केला आहे की, शहरामध्ये धार्मिक दंगल घडवण्याचा कट रचण्यात येत आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक