‘आय.एम्.ए.’च्या अध्यक्षांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !
‘आय.एम्.ए.’चा कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यासाठी वापर न करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचे प्रकरण
नवी देहली – इंडियन मेडिकल असोसिएशनचे (‘आय.एम्.ए.’चे) अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या संघटनेच्या मंचाचा वापर न करण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. त्याच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात त्यांनी आव्हान दिले. उच्च न्यायालयाने आदेशाला स्थगिती देण्याची जयलाल यांची मागणी फेटाळली. उच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही कोणताही एकतर्फी आदेश संमत करणार नाही; कारण दुसर्या पक्षाचे कुणीही न्यायालयात उपस्थित नाहीत.