गुरूंच्या संदर्भातील गीते ऐकतांना मन निर्विचार होऊन शांतता अन् स्थिरता अनुभवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती जानकी राधाकृष्णन् !
नामवंत कलाकारांनी म्हटलेली गाणी ऐकतांना मन बहिर्मुख होणे; मात्र ‘विष्णुतत्त्व जागृती’ सोहळ्यात साधिकांनी गायलेली गुरूंच्या संदर्भातील गीते ऐकतांना मन निर्विचार होऊन शांतता अन् स्थिरता अनुभवणार्या (पू.) सौ. उमाक्कांच्या मातोश्री ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती जानकी राधाकृष्णन् !
‘१७.१२.२०१९ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘विष्णुतत्त्व जागृती’ सोहळा झाला. त्या सोहळ्याच्या समारोपाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी म्हटलेली ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’ तसेच ‘गुरु-शिष्य का नाता ।’, ही गीते मी ऐकत होते. माझी आई श्रीमती जानकी राधाकृष्णन् याही ही गीते ऐकत होत्या. त्यांना ही गीते ऐकतांना आलेली अनुभूती त्यांनी मला सांगितली.
त्या म्हणाल्या, ‘‘आपण अनेक नामवंत कलाकारांनी गायलेले कर्नाटक संगीत ऐकतो. ते ऐकतांना आपले मन बहिर्मुख होते. आपले लक्ष गायकाचा आवाज, गाण्यातील शब्द आणि गायकाचे हावभाव यांच्याकडे जाते. त्यांचे गाणे ऐकतांना चांगले वाटते; पण मनाला शांती मिळत नाही. एकदा गाणे संपले की, आपण सर्व विसरून जातो; मात्र महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिका गुरूंच्या संदर्भातील गाणी म्हणत असतांना मला शांतता आणि स्थिरता जाणवली. माझे मन निर्विचार झाले. मला त्या गाण्यातील शब्दांचा पूर्ण अर्थ समजला नसला, तरी साधिकांचा त्यांच्या गुरुदेवांप्रती असलेला उत्कट भाव मला जाणवला. माझी ही स्थिती बराच काळ टिकून होती.’’
– (पू.) सौ. उमा रवीचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (२७.६.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |