संतांच्या समवेत महाप्रसाद ग्रहण करतांना जलदेवतेला प्रार्थना करून पाणी पितांना त्या पाण्याला बाह्य कारणाविना आपोआप मोगर्याच्या फुलांचा सुगंध येणे
‘२७.७.२०२० या दिवशी मी आश्रमातील भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करत होते. तेव्हा माझ्यासमोर सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि बाजूला पू. गुरुनाथ दाभोलकरकाका महाप्रसाद ग्रहण करत होते. मी पाण्याचा पेला हातात घेतला आणि मी जलदेवतेला म्हणाले, ‘‘संतांच्या सहवासात चैतन्यमय वातावरणात मी हे जल पीत आहे.’’ नंतर मी पाणी पितांना त्या पेल्यातील पाण्याला मोगर्याच्या फुलांचा पुष्कळ सुगंध येत होता. तेव्हा ‘अरेऽ ! पाण्यात मोगर्याची फुले घातली आहेत का ?’, असा विचार माझ्या मनात आला. नंतर माझ्या लक्षात आले, ‘मी पिण्यासाठी पाणी घेतलेल्या पेल्यात मोगर्याची फुले घातली नसून आश्रमातील शीतकरण यंत्रातील पाणी घेतले आहे. देवाने मला ही अनुभूती दिली आहे.’ – सौ. नीला गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.७.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |