स्नानापूर्वी पाण्यामध्ये सनातन-निर्मित ‘गोमूत्र-अर्क’ घालून जलदेवतेला प्रार्थना करताच तिचे सूक्ष्मातून दर्शन होणे

सौ. नीला गडकरी

‘मी पर्वरी (गोवा) येथील माझी मुलगी सौ. रसिका दळवी हिच्या घरी काही दिवसांसाठी गेले होते. तेव्हा ‘दळणवळण बंदी’मुळे मला तिच्याकडेच रहावे लागले होते. जुलै २०२० मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे भ्रमणभाषच्या माध्यमातून आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. एकदा आढाव्यात त्यांनी प्रत्येक कृती करतांना वेगवेगळा भाव ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या सेवा करतांना, तसेच वैयक्तिक आवरतांना प्रार्थना करून देवाविषयी भाव ठेवत होते. एक दिवस मी स्नान करतांना पाण्यामध्ये सनातन-निर्मित ‘गोमूत्र-अर्क’ घातले आणि प्रार्थना केली, ‘हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझे शरीर आणि अंतर्मन शुद्ध होऊ दे अन् वातावरणातील ईश्वरी चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे.’ नंतर मी जलदेवतेला म्हणाले, ‘तू कुठे आहेस ?’ तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘माझ्या डोळ्यांसमोर एक नदी वहात होती आणि त्यातून जलदेवता वरती आली. ती पुष्कळ सुंदर दिसत होती.’ नंतर मी तिला नमस्कार करून स्नानाला आरंभ केला. तेव्हा ‘त्या पाण्याला वेगळाच दैवी सुगंध येत आहे’, असे माझ्या लक्षात आले. मी स्नानाच्या पाण्यात ‘गोमूत्र-अर्क’ घातले होते; पण पाण्याला त्याचा गंध न येता वैशिष्ट्यपूर्ण गोड सुगंध येत होता. त्यामुळे मला पुष्कळ आनंद जाणवत होता. स्नान झाल्यानंतर मला पुष्कळ हलके वाटून ‘माझ्या संपूर्ण देहाची शुद्धी झाली आहे’, असेही मला जाणवले. मी शरिराला स्पर्श केल्यावर मला वेगळेच जाणवत होते. अशा प्रकारची अनुभूती मला सलग पाच दिवस आली.’ – सौ. नीला रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.७.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक