अवैधपणे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या संदर्भात पोलिसांची उदासीन भूमिका ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘धर्माचा प्रचार करणे याचा अर्थ बळजोरीने धर्मांतर करणे, असा नव्हे. असे प्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा’, असे मध्यप्रदेश न्यायालयातील न्यायाधिशांनी सांगितले. त्यामुळे कायद्यात तरतूद असूनही धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. अशा वेळी ‘प्रशासकीय अधिकारी ख्रिस्त्यांना मिळाले आहेत का ?’, असा प्रश्न निर्माण होतो. ‘ड्रग्ज अँड रेमिडिज कायद्या’नुसार रोग बरे करण्याच्या नावाखाली केल्या जाणार्‍या अवैज्ञानिक दाव्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी; मात्र ‘तुमचा रोग डॉक्टर बरे करू शकत नाहीत, आम्ही येशूला प्रार्थना करतो’, असा उघडपणे दावा करणार्‍यांच्या विरोधात काहीच कारवाई होत नाही. धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.