खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण समर्थनीय नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना प्रमुख
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे प्रकरण
मुंबई – उद्या कुणी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडला ओसामा बिन लादेन याचे नाव देण्यासाठी अर्ज दिला, तर त्यांचे शिफारसपत्र खासदार राहुल शेवाळे मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील का ? खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण समर्थनीय नाही, असे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्यासाठी राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यावर अनेक हिंदु धर्मप्रेमींनी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे संताप व्यक्त केला होता. त्यावर खासदार राहुल शेवाळे यांनी ‘माझ्याकडे आलेले पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवले’, असे स्पष्टीकरण दिले होते.
श्री. अजय सिंह सेंगर म्हणाले, ‘‘ज्या मोइन्नुद्दीन चिश्ती याने हिंदु सम्राट पृथ्वीराज चौहान यांना पकडून दिले. त्या मोइनुद्दीन चिश्तीच्या नावाची शिफारस करणे, हा हिंदुद्रोह आहे.’’