बांसवाडा (राजस्थान) येथील अपक्ष महिला आमदाराकडून पोलिसाला मारहाण ! : जाणून घ्या कारण
नाकाबंदीच्या वेळी भाच्याला अडवल्याचा आला होता राग !
अशा आमदारांची आमदारकी रहित करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
बांसवाडा (राजस्थान) – आपल्या भाच्याची दुचाकी अडवून दंड ठोठावल्यावरून कुशलगडच्या अपक्ष महिला आमदार रमिला खरिया यांनी महेंद्रनाथ सिंह या पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार नाकाबंदी असल्याने आमदाराचा भाचा सुनील बारिया याची दुचाकी अडवण्यात आली होती. त्या वेळी बारिया याला राग आला आणि तो पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊ लागला. (हा उद्दापमणा आमदारांच्या नातेवाइकांमध्ये कुठून येतो ? आपले नातेवाईक लोकप्रतिनिधी, मंत्री आदी असल्यावर त्यांना कायदा त्यांच्या मालकीचा वाटू लागतो का ? अशी धमकी देणार्यांनाही अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक) यामुळे मी त्याला दंड ठोठावला. याची तक्रार सुनील याने आमदार रमिला खरिया यांच्याकडे केली. यानंतर संतापलेल्या आमदाराने मला मारहाण केली.
भतीजे की गाड़ी रोकने से आगबबूला हुईं विधायक
(@sharatjpr ) https://t.co/ob8lZXNHuS— AajTak (@aajtak) June 15, 2021
ठाणे अंमलदाराकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !
महेंद्रनाथ यांनी या प्रकरणी आमदारावर गुन्हा नोंदवण्याविषयी सांगितले असता ठाणे अंमलदार प्रदीप कुमार यांनी त्यांना महिला आमदाराची क्षमा मागण्यास सांगितले. (गुन्हेगारांना पाठीशी घालून पीडितांवर दबाव टाकणार्या प्रदीप कुमार यांना कारागृहात डांबले पाहिजे ! असे कायदाद्रोही पोलीस कायद्याचे रक्षण करू शकत नसल्याने त्यांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे ! – संपादक) क्षमा मागण्यास महेंद्रनाथ यांनी नकार दिला. अन्य पोलिसांनीही त्याचे समर्थन करत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. (न्यायाच्या बाजूने उभ्या रहाणार्या पोलिसांचे अभिनंदन ! – संपादक) त्यामुळे पोलिसांनी आमदाराविरोधात गुन्हा नोंदवला.