हिंदुत्वनिष्ठांच्या नियमित ‘ऑनलाईन’ धर्मजागृती बैठकांना कृतीशील प्रारंभ !
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीची छत्तीसगड येथे ‘ऑनलाईन’ संपर्क मोहीम
दुर्ग (छत्तीसगड) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी छत्तीसगड राज्यातील विविध हिंदुत्वनिष्ठांशी ‘ऑनलाईन’ संपर्क साधला. या संपर्काच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी नियमितपणे धर्मजागृती बैठका घेण्याची मागणी केली. त्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गुरुवारी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींची ‘ऑनलाईन’ नियमित धर्मजागृती बैठक चालू करण्यात आली आहे. या बैठकीला दुर्ग, रायपूर, बिलासपूर, राजनांदगाव, राजिम, रायगड आणि कोरबा येथील १५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये हिंदुत्वनिष्ठांनी ते करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म कार्याचा परिचय करून दिला.
या वेळी योगऋषी रामदेवबाबा यांच्या विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने केलेल्या कारवाईच्या विरोधात असोसिएशनचे प्रमुख डॉ. जॉनरोज जयलाल यांच्या विरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठांनी सहमती दाखवली. तसेच या प्रसंगी राजिम येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. तुषार कदम यांनीही अधिवक्त्यांचा सल्ला घेऊन डॉ. जॉनरोज जयलाल यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याची सिद्धता दर्शवली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. ‘सर्व हिंदुत्वनिष्ठांचा समन्वय ठेवण्यासाठी या धर्मजागृती बैठकीचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे ही बैठक नियमित चालू ठेवावी’, अशी इच्छा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
२. ‘कोरोनाकाळात गायत्री परिवाराकडून यज्ञ करण्यात येत आहेत’, असे परिवाराचे छत्तीसगड आणि ओडिशा विभाग समन्वयक श्री. दिलीप पाणिग्रही यांनी सांगितले.
धर्महानी विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या कृती
१. रायपूर येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते तथा गोरक्षक श्री. अंकित द्विवेदी यांनी स्थानिक मंदिरात मूर्तीची तोडफोड झाल्याच्या विरोधात निवेदन दिले.
२. एका काँग्रेस कार्यकर्त्याने केलेल्या धर्महानी प्रकरणी किरंदुल (जगदलपूर) येथील श्री. प्रवेशकुमार जोशी यांनी विविध १० ठिकाणी पोलीस तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.