भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची नूतन आयुर्वेदाची औषधे
सध्याच्या कोरोनाच्या रूपाने आपत्काळाची झलक अनुभवायला येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध नसणे, ऑनलाईन औषधे मागवली, तरी ‘दळणवळण बंदी’मुळे ती वेळेत न पोचणे, औषधांचा तुटवडा असल्याने त्यांचा काळाबाजार होणे’, असे अनेक वाईट अनुभव अनेकांनी घेतले आहेत. भावी भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण आतापासूनच सिद्धता करणे आवश्यक आहे. आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्या २० आयुर्वेदीय औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील. या औषधांविषयीची माहिती आपण क्रमशः पहात आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/486763.html |
२. सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण
२ अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : हे औषध वात आणि कफ नाशक असून याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
२ आ. सूचना
१. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव प्रमाणात आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात औषधाचे चूर्ण घ्यावे.
२. मधुमेह असल्यास औषध मधासह न घेता पाण्यासह घ्यावे किंवा नुसतेच चघळून खावे.
३. उष्णतेची लक्षणे (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी) असतांना आणि उन्हाळा अन् पावसाळ्यानंतर येणारा शरद ऋतू (ऑक्टोबर हिट) या काळांत पिंपळीचा वापर टाळावा किंवा अल्प करावा.
४. उष्णता वाढल्यास पिंपळी बंद करून १ – २ दिवस दिवसातून २ वेळा १ पेला लिंबू सरबत प्यावे.
३. सनातन वासा (अडुळसा) चूर्ण
३ अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
३ आ. सूचना : वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/487233.html |