मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडला हिंदु सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे नाव द्यावे ! – अजय सिंह सेंगर, सेनाप्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
मुंबई – मोइनुद्दीन चिश्ती या अत्याचारी शासकाने पृथ्वीराज चौहान यांना पकडून देण्यास साहाय्य केले. त्याने असंख्य हिंदूंच्या हत्या केल्या. त्या मोइनुद्दीन चिश्ती याचे नाव मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडला देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे, याचा आम्ही निषेध करतो. या पुलाला महान हिंदु सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी केली आहे.