गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू, तर ४२० नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात १३ जून या दिवशी कोरोनाबाधित १४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची सख्या २ सहस्र ९२८ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र २ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४२० नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १४ टक्के आहे. दिवसभरात ५८१ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ५७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.