अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींचे वर्चस्व दर्शवणारी लक्षणे !
अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींकडून व्यक्तीला होणार्या त्रासाची काही लक्षणे येथे दिली आहेत. ही लक्षणे पुष्कळ अधिक प्रमाणात आढळल्यास तो वाईट शक्तींमुळे होणार्या त्रासाचा भाग आहे, असे लक्षात येते. यावरून सात्त्विक आहाराचे महत्त्व लक्षात येईल !
खाण्याची आवड आणि इच्छा
- अन्नाविषयी जास्त प्रमाणात वासना असणे
- हावरटपणा असणे, त्यामुळे आवडते पदार्थ राखून ठेवणे
- राजसिक आणि तामसिक अन्न खावेसे वाटणे
- घरच्या अन्नापेक्षा बाहेरचा पदार्थ अधिक आवडणे
- उपहारगृहामधील अन्नाविषयी आकर्षण असणे
- बाहेरचे चटपटीत पदार्थ (‘फास्ट फूड’) खावेसे वाटणे
- शाकाहारापेक्षा मांसाहार करायला आवडणे
- कोणताही मांसाहार करायची सिद्धता असणे
- अन्नासमवेत कृत्रिम शीतपेय किंवा मद्य पिणे
- खाण्याची इच्छा झालेला पदार्थ न मिळाल्यास रडू येणे
- समोरची व्यक्ती खात असलेल्या अन्नाकडे लक्ष जाणे आणि त्यातील पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होणे
खाण्याची पद्धत
- आधाशाप्रमाणे खाणे, अन्न नीट न चावताच ग्रहण करणे
- सतत काही वेळाने खात रहावे’, असे वाटणे
खाण्याविषयी असणार्या सवयी
- नाविन्यपूर्ण पदार्थ बनवत रहाणे
- निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू वापरून पदार्थ बनवणे
- एखाद्या ठिकाणी काही विशेष पदार्थ मिळत असल्यास तो आवर्जून खाण्याची सवय असणे
- स्वतः अधिक खाणे आणि इतरांनाही अधिक खायला घालणे
असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम
१. भूक लागणे / न लागणे
- अधिक भूक लागणे, अधिक खाल्ले, तरी समाधान नसणे
- भूक न लागणे, तसेच काही खाल्ले नाही तरी काही न वाटणे
२. सात्त्विक अन्न
- सात्विक अन्न खाऊ नये’, असे वाटणे
- सात्विक अन्नाला नावे ठेवणे
- सात्विक अन्न बेचव लागणे
३. परिणाम
- अन्नपचन न होणे, तसेच शौचाला दुर्गंध येणे
- खाल्लेल्या अन्नामुळे अंग जड होणे
- पोटात वाताचे प्रमाण जास्त असणे
- स्वप्नात स्वतः खातांना दिसणे
- अन्नावरून व्यक्तींमध्ये भांडणे होणे
– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर, सनातन संस्था