सात्त्विक आहाराला साधनेची जोड द्या !
शरीर निरोगी राखण्यासाठी, तसेच मानवाचा प्रवास मानव्याकडून दानव्याकडे न होता देवत्वाकडे होण्यासाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. त्यासाठी सात्त्विक आहार घ्यायला हवा. अर्थात् देवत्वाकडे जाण्यासाठी केवळ सात्त्विक आहार पुरेसा नाही. त्यासाठी प्रत्येकाने ‘साधना’ करण्यास आरंभ करायला हवा. काळानुसार योग्य साधना कोणती आणि ती कशी करावी, हे ‘सनातन संस्था’ शिकवते.
अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा ‘नाम’धारी बनण्याला, म्हणजे नामजप करण्याला महत्त्व असणे !
आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी शाकाहारी बनणे अत्यावश्यक नाही; पण शाकाहारामुळे व्यक्तीमधील सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचा आहे. तसेच आपण कोणत्या मार्गाने साधना करत आहोत, त्यावरसुद्धा शाकाहाराचे महत्त्व अवलंबून आहे, उदा. हठयोगामध्ये देहशुद्धीला अत्यंत महत्त्व आहे.
त्यामुळे हठयोगानुसार साधना करणार्याला शाकाहारी असणे आवश्यक ठरते. अध्यात्मशास्त्रानुसार शाकाहाराने व्यक्तीतील ०.०००१ टक्के इतका सत्त्वगुण वाढतो, तर भावपूर्ण नामजपाने तो ५ टक्के इतका वाढतो. त्यामुळे भावपूर्ण नामजप करणे जास्त महत्त्वाचे आहे.