घास घेतांना पाचही बोटांचा वापर का करावा ?
‘चमच्याने अन्न तोंडात घालतांना चमच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते; पण बोटांनी अन्न ग्रहण करतांना बोटांमध्ये कार्यरत असणारी ईश्वरी शक्ती अन्नाद्वारे पोटात जाते. तळहातातून बोटांत नेहमी ईश्वरी शक्तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होत असते. बोटांद्वारे अन्न ग्रहण करतांना बोटांचा तोंडाला स्पर्श होतो. स्पर्श होणार्या बोटांवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण तळहातातील ईश्वरी शक्तीमुळे नष्ट होते, तसेच जिवाला ईश्वरी शक्तीचा लाभ होतो आणि हाताची बोटेही ईश्वरी शक्तीने भारित होतात.’
– एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गडेकर यांच्या माध्यमातून, ११.४.२०१०, रात्री ८.१०)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |