जेवणात भात नसल्यास चुकल्यासारखे का वाटते ?
सात्त्विक आहाराविषयी प्रश्नोत्तरे
तांदूळ हे सर्वाधिक सात्त्विक धान्य !
‘अन्न ग्रहण केल्याने जिवाला आवश्यक असणारे चैतन्य आणि ऊर्जा मिळते. इतर धान्यांच्या तुलनेत तांदळात सर्वाधिक सात्त्विकता आहे. जे जीव खर्या अर्थाने अंतर्मुख असतात, त्यांना जेवतांना मिळत असलेल्या सात्त्विकतेची जाणीव असते आणि जेवणातून निश्चित प्रमाणात सात्त्विकता न मिळाल्यास त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटते. कलियुगात असे जीव २० टक्केच आहेत. तांदूळ हे लवकर पोट भरण्याचे साधन असल्याने जेवणात भात किंवा तांदळाची भाकरी नसल्यास बहिर्मुखता असलेल्या जिवांनाही अन्नग्रहणातील उणीव जाणवते.’
(श्री. निमिष त्रिभुवन म्हात्रे यांच्या माध्यमातून, ९.११.२००५, रात्री ९.१२)