गोव्यात प्रवेश करण्यासाठी ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला बंधनकारक
पणजी, १२ जून (वार्ता.) – गोवा खंडपिठाच्या आदेशानुसार राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला बंधनकारक असल्याची माहिती शासनाने दिली आहे. राज्यात प्रवेश करण्यापूर्वी अधिकाधिक ७२ घंटे अगोदर कोरोनाविषयीची चाचणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे. ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला म्हणजे ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’, ‘ट्यूनेट’, ‘सी.बी.एन्.ए.ए.टी.’, ‘रॅपीड अँटीजेन’ किंवा ‘आय.सी.एम्.आर्.’ यांची मान्यता असलेली अन्य कोणतीही चाचणी यांपैकी एका चाचणीचा दाखला असणे आवश्यक आहे.