सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण
दिवसभरात १३ जणांचा मृत्यू, तर ६११ नवीन रुग्ण
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १२ जूनला कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८५५ झाली आहे, तर ६११ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. दिवसभरात ६६० रुग्ण कोरोनातून बरे झाले. जिल्ह्यात एकूण ६ सहस्र ५७४ रुग्ण उपचार घेत आहेत, तर २६ सहस्र २२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ सहस्र ६५५ झाली आहे.