हेरगिरीसाठी चालवण्यात येणार्‍या बेंगळुरू येथील अवैध दूरभाष केंद्रावर पोलिसांची धाड !

इब्राहिम पुलत्ती आणि के.व्ही. गौतम

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक पोलीस आणि सैन्याचा गुप्तचर विभाग यांनी येथे अवैधरित्या चालवण्यात येणारे दूरभाष केंद्र (टेलिफोन एक्सचेंज) यांवर धाड टाकून ते बंद केले. या केंद्रात आंतरराष्ट्रीय कॉल आल्यावर ते स्थानिक कॉलमध्ये परावर्तित करण्यात येत होते. यासह विदेशातून दूरभाष येत असल्याचे कुणाला लक्षात येऊ नये, तसेच त्याद्वारे हेरगिरी करता यावी, असे प्रयत्न केले जात होते. विदेशी हस्तकांना गोपनीय माहिती पुरवण्यात येत होती. या प्रकरणी केरळच्या मल्लपूरम् येथे रहाणारा इब्राहिम पुलत्ती आणि तमिळनाडू येथील रहाणारा के.व्ही. गौतम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३२ सिम कार्डस् आणि अन्य ३० ‘ईलेक्ट्रॉनिक’ उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.