‘गांधार’ या शब्दाचे संस्कृत व्युत्पत्तीनुसार अर्थ
१. गंधरस
गन्ध एव गान्धं सुगन्धम् ऋच्छति इति । ऋ गतौ । – शब्दकल्पद्रुम
अर्थ : ‘गंध म्हणजेच गांध, म्हणजेच सुगंध. ‘ऋ’ हा धातू (क्रियापदाचे मूळ रूप) गतीवाचक आहे. यावरून ‘सुगंध वाहून नेणारा’ तो ‘गांधार’ होय. यालाच ‘त्रिकांडशेष’ कोशात ‘गंधरस’ असे म्हटले आहे.
२. सिंदूर किंवा कांधार प्रदेश (सध्याचा अफगाणिस्तान)
गन्ध एव गान्धः गन्धकः तं ऋच्छति उत्पत्तिकारणत्वेन गच्छति इति । – शब्दकल्पद्रुम
अर्थ : गंध म्हणजेच गांध, म्हणजेच गंधक (सल्फर). गंधकाचे उत्पत्तीस्थान असलेला, तो ‘गांधार’ प्रदेश. (प्राचीन काळापासून या भागात गंधकाच्या खाणी आहेत.)’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.५.२०१९)