ज्येष्ठ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
साप्ताहिक शास्त्रार्थ
‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, ग्रीष्मऋतू, ज्येष्ठ मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. रंभाव्रत : ज्येष्ठ शुक्ल तृतीया तिथीला ‘रंभाव्रत’ करतात. हे व्रत स्त्रिया करतात. स्वर्गीय अप्सरा रंभा हिने सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले. यामुळे याला ‘रंभाव्रत’ असे म्हणतात. ‘चांगला पती मिळावा’, यासाठी कुमारिका हे व्रत करतात. ‘पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे आणि बुद्धीमान संतती व्हावी’, यासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामध्ये भगवान सूर्यदेवासाठी दीप लावतात. देवीचे धान्य आणि फुले यांनी पूजन करून श्री महाकाली, श्री महालक्ष्मी अन् श्री महासरस्वती यांचा जप करतात.
२ आ. विनायक चतुर्थी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात. १४.६.२०२१ या दिवशी विनायक चतुर्थी आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १४.६.२०२१ या दिवशी सकाळी १०.१२ पासून रात्री १०.३५ पर्यंत आणि १७.६.२०२१ या दिवशी रात्री १०.०० पासून १८.६.२०२१ या दिवशी सकाळी ९.२४ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १५.६.२०२१ या दिवशी रात्री १०.५७ पासून १६.६.२०२१ या दिवशी रात्री १०.१५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ उ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे.
१५.६.२०२१ या दिवशी मंगळवार असून रात्री १०.५७ पर्यंत पंचमी तिथी, १८.६.२०२१ या दिवशी शुक्रवार असून रात्री ८.४० पर्यंत अष्टमी तिथी आणि १९.६.२०२१ या दिवशी शनिवार असून सायंकाळी ६.४६ पर्यंत नवमी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.
२ ऊ. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. १८.६.२०२१ या दिवशी रात्री ८.४० पर्यंत दुर्गाष्टमी आहे. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. दुर्गासप्तशती स्तोत्र, देवी कवच, अर्गला स्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात.
२ ए. महेश नवमी : ज्येष्ठ शुक्ल नवमी तिथीला ‘महेश नवमी’ साजरी करतात. या दिवशी महेश म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वतीचे पूजन करतात. माहेश्वरी समाजाचा हा उत्पत्ती दिवस मानला जातो.
साधकांनी पुढील वचने लक्षात ठेवावीत.१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
|
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३०.५.२०२१)