कोल्हापुरात शनिवार, रविवार कडक दळणवळण बंदी !
कोल्हापूर – जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर १७.९६ टक्के आहे, तसेच ‘पॉझिटिव्हिटी रेट’ही १५.८५ टक्के आहे. राज्यशासनाच्या नियमानुसार कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी या दोन्ही दिवशी अत्यावश्यक आणि अतीतातडीच्या सेवांव्यतिरिक्त इतर सेवा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यात वृत्तपत्र मुद्रण, विक्री, रुग्णालये, औषधे विक्री, निर्मिती, शेतीची कामे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बस), माल वाहतूक, बसेस, लांब पल्ल्याचा रेल्वेचा प्रवास चालू रहाणार आहे.