महाराष्ट्र पोलीसदलात ३० वर्षे काम करूनही तुमचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाही का ? – सर्वोच्च न्यायालय
परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी देहली – महाराष्ट्र पोलीसदलात तुम्ही ३० वर्षे काम केले आहे. तरीही तुमचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाही का ? हे धक्कादायक आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली. माझ्याविरुद्ध करण्यात येणारे अन्वेषण हा सूडाचा भाग असून हे अन्वेषण महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील अन्वेषण यंत्रणांनी करावे, अशी मागणी सिंह यांनी या याचिकेद्वारे केली होती.
“This is surprising us. You have been a part of Maharashtra state cadre and served it for over 30 years. Now you are saying that you have no trust in your own state police. This is shocking,” the SC bench said.https://t.co/O71ABi1UFx
— Economic Times (@EconomicTimes) June 11, 2021