रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार
|
|
रेवाडी (हरियाणा) – येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या ७ जणांपैकी केवळ १ जण १८ वर्षांचा असून अन्य सर्वजण १० ते १२ वर्षांचे आहेत. या आरोपींनी बलात्कार करतांना त्याचे चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या शेजारी रहाणार्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी मुलीच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पीडित मुलीच्या शेजार्याने व्हिडिओच्या आधारे आरोपींना ओळखले आहे. हा व्हिडिओ प्रसारित करणार्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
10-year-old girl gang-raped by 8 boys, 7 of them are in the age group of 10-15#Haryana #minorhttps://t.co/l6k5lceXjH
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 11, 2021