हिंदूंनी ५ ते ६ मुलांना जन्म द्यावा ! – महंत नरसिंहानंद
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – मुसलमानांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. जेथे जेथे मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे, तेथे तेथे ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. ज्या पद्धतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, ते पाहता हे मोठे संकट येत आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने न्यूनतम ५ ते ६ मुलांना जन्म दिला पाहिजे, तसेच प्रत्येक हिंदूने शस्त्रधारी झाले पाहिजे, असे प्रतिपादन येथील डासना मंदिराचे महंत नरसिंहानंद यांनी केले. गोवर्धन प्रदक्षिणा मार्गावरील रमणरेती आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुस्लिमांची लोकसंख्या चितेंची बाब असून, हिंदूंनी ५ ते ६ मुलांना जन्म द्यावा : महंत नरसिंहानंद https://t.co/Jd0GYLPN5o < येथे वाचा सविस्तर वृत्त #UttarPradesh #Narasimhanand #Hindu #Muslim pic.twitter.com/FXFsn6Ifzx
— LoksattaLive (@LoksattaLive) June 11, 2021
महंत नरसिंहानंद पुढे म्हणाले, ‘‘कोरोना हे सरकारचे षड्यंत्र आहे. मास्क लावायला सांगून लोकांना आजारी पाडले जात आहे. मी स्वत: मास्क वापरत नाही आणि कोरोना असल्याचे मानतही नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती अल्प आहे, ते लोक मास्क लावतात.’’