शिक्षण किंवा नोकरी यांसाठी विदेशात जाणार्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ डोसमधील कालावधी अल्प करण्याचा उपजिल्हाधिकार्यांना अधिकार
औषधाच्या २ डोसमधील कालावधी ठरवण्यास डॉक्टर पात्र कि जिल्हाधिकारी ?
पणजी, १० जून (वार्ता.)- शिक्षण किंवा नोकरी यांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे, तसेच विदेशात जाणारे खेळाडू यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २० दिवसांनी दुसरा डोस देण्याची अनुमती देण्याचा अधिकार उत्तर गोवा अन् दक्षिण गोवा येथील उपजिल्हाधिकारी, तसेच उपजिल्हा दंडाधिकारी यांना केंद्रशासनाकडून देण्यात आला आहे. सामान्यतः कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ डोसमधील अंतर ८४ दिवसांचे असते. ते आता आवश्यकतेनुरूप अल्प होऊ शकते. ‘या गटातील व्यक्तींना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल’, असे गोवा शासनाने म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विदेशात नोकरी करणार्या गोव्यातील खलाशांना लाभ होणार आहे.