विदेशात रामायणाचा अभ्यास होतो; पण भारतात त्याची उपेक्षा होते ! – मीनाक्षी शरण, इतिहास अभ्यासक
धर्म आणि शास्त्र यांना आपण जिज्ञासू वृत्तीने समजून घ्यायला हवे. भारताबाहेर थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशांत आजही प्रभु श्रीरामांची स्मृतीचिन्हे आणि रामायणातील कथांचे चित्रण पदोपदी आढळते. या देशांतील अभ्यासक्रमातही रामायण समाविष्ट केले आहे. प्रभु श्रीराम आपल्या देशात होऊन गेले, तरी अन्य देशांनी त्यांचे स्मरण ठेवले आहे; पण भारतात मात्र रामायणाची उपेक्षा होते.