देववाणी संस्कृतच्या शब्दसामर्थ्याचे एक उदाहरण
‘वृषभ’ हा शब्द ‘वृष्’ या संस्कृत धातूपासून आला आहे. (धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप.) ‘वृष् सेचने’ या सूत्रानुसार ‘वृष्’ याचा अर्थ ‘सेचन करणे’ किंवा ‘शिंपणे’ असा होतो. याला अनुसरून ‘वृषभ’ या शब्दाचे होणारे विविध अर्थ –
१. बैल : गायीच्या ठिकाणी वीर्याचे सेचन करतो तो वृषभ (बैल).
२. कानाचे छिद्र : ज्यातून कानाला ध्वनीचे सिंचन होते, म्हणजे ध्वनी कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो, ते कानाचे छिद्र म्हणजे वृषभ.
३. धर्म : प्राणीमात्रांवर ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीचे सेचन करतो तो वृषभ (धर्म).’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.५.२०१९)