वाढीव शुल्क आकारल्याच्या कारणावरून अमरावती विद्यापीठ कुलसचिवांच्या कक्षाला भाजपा युवा मोर्चाने ठोकले कुलूप !

भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी कुलसचिवांच्या कक्षाला कुलूप ठोकून आंदोलन करतांना

अमरावती – विद्यापिठांतर्गत येणार्‍या महाविद्यालयांकडून अवाच्या सवा परीक्षा शुल्क वसूल केले जात असल्यामुळे ९ जून या दिवशी भाजपा युवा मोर्चाकडून विद्यापिठाचे कुलसचिव तुषार देशमुख यांच्या कक्षात आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु कर्मचार्‍यांनी आधीच या कक्षाला कुलूप लावून ठेवले होते. हे कुलूप तोडण्याचा प्रयत्न भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला; मात्र प्रयत्न करूनही कुलूप न तुटल्याने शेवटी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी कुलसचिवांच्या कक्षाला कुलूप ठोकून आंदोलन चालू केले.

मोर्चाचे सोपान कणेरकर म्हणाले, ‘‘कोरोनामुळे नागरिक त्रस्त असतांना शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर अधिक परिणाम होत आहे. विद्यापीठ महाविद्यालयांवर नियंत्रण करत असते; परंतु अमरावती विद्यापिठाचे महाविद्यालयांवर नियंत्रण नसते. अशा पिळवणुकीतून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी शिक्षण संस्थांनी काढलेल्या नियमावलीचे पालन महाविद्यालयांकडून होत नाही.’’