छडवेल (नंदुरबार) जिल्हा मध्यवर्ती बँकेतील हिंदुद्वेषी कर्मचारी नामदेव बच्छाव यांच्याकडून श्री दत्ताचे चित्र रस्त्यावर फेकून त्यावर बूट घालून उभे राहून अवमान !
|
|
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नंदुरबार – नंदुरबारजवळील छडवेल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील हिंदुद्वेषी कर्मचारी नामदेव वंजी बच्छाव यांनी हिंदूंचे आराध्यदैवत श्री दत्तगुरूंचे चित्र रस्त्यावर फेकून त्यावर दोन्ही पाय ठेवून श्री दत्ताचा घोर अवमान केला आहे. ‘या निंदनीय कृत्याप्रकरणी बच्छाव यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून त्यांना कठोर शासन करावे’, अशी मागणी ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही पाठवले आहे. (धर्महानी रोखण्यासाठी कृती करणार्या ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’चे अभिनंदन ! इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यातून बोध घेऊन हिंदु देवतांच्या अवमानाच्या विरोधात संघटित होऊन वैध मार्गाने लढा द्यावा ! – संपादक)
या वेळी समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. डॉ. आर्.सी. बेडसे, सर्वश्री मोहन जैन, नरेंद्र तांबोळी, जितेंद्र मराठे, गणेश राजपूत, सुमित परदेशी, चेतन राजपूत, मुकेश माळी, जितेंद्र राजपूत, मयुर चौधरी, उज्ज्वल राजपूत, नरेंद्र चौधरी, राजू चौधरी, अनिल मोरे, आकाश गावित आदी उपस्थित होते. या सर्वांनी निवेदनावर स्वाक्षर्या करून ते जिल्हाधिकार्यांकडे सुपुर्द केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेत श्री दत्तगुरु यांचे चित्र लावले आहे; मात्र चित्र न आवडल्याने बच्छाव यांनी ते फेकून देत त्यावर पाय ठेवण्याचा संतापजनक कृत्य केले आहे. याविषयी नागरिकांनी त्यांना खडसवल्यावर ते या हीन कृत्याचे समर्थनच करत होते. बच्छाव हे नोकरीत राहिल्यास ते पुन्हा असे कृत्य करण्याची आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर वरीलप्रकारे कारवाई करावी.