इंधन दरवाढीच्या माध्यमातून सरकार जिझिया कर वसूल करत आहे ! – पृथ्वीराज चव्हाण
सातारा – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अल्प होत आहेत; मात्र भारतामध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये, तर डिझेलचे ९२ रुपयांपेक्षा अधिक आहेत. स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपयांच्या घरात गेला आहे. मोदी सरकारची ही ‘दरवाढ’ नसून ‘करवाढ’ आहे. इंधन दरवाढीच्या माध्यमातून सरकार सामान्य जनतेकडून जिझिया कर वसूल करत आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले, महागाई अशीच वाढत राहिली, तर जनतेचे जगणे कठीण होईल. कोरोनामुळे जनता अगोदरच त्रस्त झाली आहे. त्यातच महागाई वाढ आहे. काँग्रेस शासनाच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती वाढूनही तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्याचा परिणाम देशांतर्गत इंधन दरवाढीवर होऊ दिला नाही.