फलटण (जिल्हा सातारा) येथे जिवंत युवकाला केले मृत घोषित
असंवेदनशील फलटण आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !
सातारा – फलटण (जिल्हा सातारा) येथे २० वर्षीय युवक सिद्धांत मिलिंद भोसले हा जिवंत असूनही कोरोनामुळे मृत झाला असे, आरोग्य विभागाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.
सिद्धांत भोसले याची मेमध्ये कोरोना चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली होती. त्यानंतर त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले आणि तो बराही झाला; मात्र फलटण तालुक्याच्या आरोग्य विभागाने ७ जून या दिवशी सिद्धांतचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या आईला भ्रमणभाषवर दिली. तेव्हा भोसले कुटुंबियांनी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला. जिल्हा शल्य चिकित्सक आधुनिक वैद्य सुभाष चव्हाण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.