महाराष्ट्रात ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या ५ सहस्रच्या वर
नागपूर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक येथे रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक
मुंबई – राज्यात २८ मेपर्यंत ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या ५ सहस्रच्या वर पोचली आहे. यामध्ये नागपूर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक येथे रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे.
यावरील औषधासाठी केंद्रशासनाकडे मागणी करण्यात आली असून ‘हाफकिन’कडून १० जूनपर्यंत ४० सहस्र औषधांच्या कुप्या महाराष्ट्रासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती या वेळी आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सादर केली.