उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी, परिचारिका यांना ‘पीपीई किट’ वाटप !
कोल्हापूर, ८ जून (वार्ता.) – युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्या पुढाकाराने सातत्याने कोरोना रुग्णांच्या संपर्कात असणारे आरोग्य अधिकारी आणि परिचारिका यांना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘पीपीई किट’चे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. सुजित चव्हाण, स्मिता सावंत, सर्वश्री शिवाजीराव जाधव, वैभव जाधव, शेखर बारटक्के, मंगेश चितारे यांसह अन्य उपस्थित होते.