आरोग्य विभागात २ सहस्र २२६ पदांची भरती होणार !

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाचे संकट गेल्या वर्षीपासून आलेले असतांना इतका कालावधी ही पदे रिक्त रहाणे अयोग्य ! सरकारने तातडीने या पदांची भरती करणे अपेक्षित होते, असे जनतेला वाटते !

मुंबई – कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागात २ सहस्र २२६ पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नंदुरबार, बुलढाणा, वर्धा, नागपूर, गोंदिया, संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नगर, नांदेड, पालघर, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि कोल्हापूर येथे ही भरती होणार आहे. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट या आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणार्‍या पदांची भरती करण्यात येणार आहे. औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य साहाय्यक, साहाय्यक परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता, साहाय्यक परिचारिका प्रसविका अशी पदे भरण्यात येणार आहेत.