बनावट कागदपत्रांचा वापर करून कह्यात घेतलेल्या गाडीची परस्पर विक्री !
परिवहन अधिकार्यांसह १२ जणांविरोधात गुन्हा
नवी मुंबई – कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या गाडीची (कारची) परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवी मुंबईचे तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांच्यासह कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेड आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात खोटी तक्रार देऊन एपीएमसी पोलिसांचीही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या ही गाडी कह्यात घेतली असून पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे. त्यानंतर यामध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.