भारतासमवेत ट्विटर पूर्णपणे कटीबद्ध आहे आणि राहील !
केंद्र सरकारच्या चेतावणीनंतर ट्विटर नरमले !
चेतावणी दिल्यानंतर ट्विटर नरमते, हे लक्षात घ्या ! सरकारने अशांवर अधिक कठोर नियम लागू केले पाहिजेत !
नवी देहली – भारतासमवेत ट्विटर पूर्णपणे कटीबद्ध आहे आणि राहील. नवे नियम आणि सूचना यांचे पालन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. त्या दिशेने करत असलेल्या कामाचा कायदेशीर आढावा आम्ही दिला आहे. भारत सरकारसमवेत आमचा संवाद चालू ठेवू, अशी नरमाईची भूमिका ट्विटरने केंद्र सरकारने दिलेल्या शेवटच्या चेतावणीवर घेतली.
भारत सरकार के सामने झुका ट्विटर: नई IT गाइडलाइन का पालन करने के लिए हुआ राजी#Twitterhttps://t.co/H8qoIMn22u
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 31, 2021
केंद्र सरकारने सामाजिक माध्यमांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक माध्यमांच्या आस्थापनांनी २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करणे अनिवार्य होते; मात्र ट्विटरने या नियमांचे पालनास नकार दर्शवला होता. त्यामुळे केंद्राने ट्विटरला शेवटची नोटीस बजावली होती. केंद्राच्या नोटिशीला ट्विटरने वरील उत्तर दिले आहे.