खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला ‘हुतात्मा’ म्हणणारे क्रिकेटपटू हरभजनसिंह यांची क्षमायाचना
नवी देहली – भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याच्या मृत्यूदिनानिमित्त त्याला श्रद्धांजली देणारी पोस्ट केल्यावरून क्षमायाचना केली आहे. श्रद्धांजली दिल्यानंतर सामाजिक माध्यमांतून हरभजनसिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. हरभजन यांनी भिंद्रनवाले याला ‘हुतात्मा’ही म्हटले होते.
Cricketer #HarbhajanSingh gets trolled for calling Khalistani terrorist a ‘martyr’, issues apology later.https://t.co/7sLbSbKlEY
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 7, 2021
हरभजन यांनी क्षमा मागतांना केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, संबंधित पोस्ट मी न वाचता आणि समजून न घेता इन्स्टाग्रामवर अपलोड केली. मी या विचारसरणीचा समर्थक नाही, ना त्या संदर्भातील कोणत्याही व्यक्तीचे समर्थन करतो. मी एक शीख आहे, जो देशाविरुद्ध नाही, तर देशासाठी लढतो. देशातील लोकांच्या भावना दुखावल्याविषयी मी विनाअट क्षमा मागतो.