हापूड(उत्तरप्रदेश) येथे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या पीडितेला गर्भपात करण्याचा पंचायतीचा आदेश
|
अशा पंचायतीला विसर्जित करून संबंधितांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
हापूड (उत्तरप्रदेश) – येथील एका भागामध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर ती गर्भवती झाली. पंचायतने तिला गर्भपात करण्याचा आदेश दिला. यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून चौकशी करण्यात येत आहे. विवाहाचे आमीष दाखवून या तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. ती ५ मासांची गर्भवती आहे. पीडित तरुणीच्या वडिलांचा आरोप आहे की, पंचायतने त्यांना गाव सोडण्याचाही आदेश दिला आहे.