खंडाळा (सातारा) परिसरात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी ९ जणांना अटक
सातारा – खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्यप्राशन करून एकाने बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या आवाजाने परिसर हादरला. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत ९ मद्यपींना अटक केली. संशयितांकडून एक बंदूक, ८ भ्रमणभाष संच, २ चारचाकी वाहने, १ दुचाकी वाहन, मद्याच्या बाटल्या असा ८ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे. संशयित युवक हे बारामती, खंडाळा आणि इंदापूर परिसरातील आहेत. संशयितांना न्यायालयापुढे उपस्थित केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.