गोव्यात दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू, तर ४१८ नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात ७ जून या दिवशी कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित २ सहस्र ७४५ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५.२२ टक्के आहे. हे प्रमाण ६ जून या दिवशीपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. दिवसभरात १ सहस्र १६२ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ७४ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ६ सहस्र ३९७ झाली आहे.