नगर येथे काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम !
नगर – कोरोनाच्या दुसर्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२१ जणांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या रोगाची लागण झाली असून त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८२ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत; मात्र असे असले तरी त्यातील काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. जीव वाचला तरी काहींचा डोळा काढावा लागला आहे.
प्राथमिक लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात तपासणी करून उपचार चालू झाल्यास जीव वाचण्याची शक्यता अधिक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच या आजारावरील उपचारासाठी दरही निश्चित केले आहेत.