नागूपर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ८४ टक्के रुग्ण !
नागपूर – पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या ६ जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत आढळलेल्या ‘म्युकरमायकोसिस’च्या (काळ्या बुरशीच्या) एकूण रुग्णांपैकी ८३.९६ टक्के रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. आजपर्यंत झालेल्या एकूण मृत्यूतील ९२ टक्के रुग्णांचे मृत्यूही जिल्ह्यातच नोंदवले गेले आहेत.
१. वरील ६ जिल्ह्यांत ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र ४४१ रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक १ सहस्र २१० (८३.९६ टक्के) रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत.
२. पूर्व विदर्भात आजपर्यंत या आजाराचे १२० मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यातील सर्वाधिक १११ मृत्यू (९२.५ टक्के) नागपूर जिल्ह्यातील आहेत. गडचिरोली आणि भंडारा या २ जिल्ह्यांत एकाही मृत्यूची नोंद नाही.
३. या जिल्ह्यांतील ‘म्युकरमायकोसिस’च्या १ सहस्र १५ रुग्णांवर विविध शस्त्रकर्मे करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ८९९ रुग्णांवर शस्त्रकर्म करण्यात आले.