सराईत गुंडाला पोलिसांवर आक्रमण करून पळून जाऊ देणार्या भाजपच्या माजी पदाधिकार्याला अटक
अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे इतरांवर वचक बसेल !
कानपूर (उत्तरप्रदेश) – पोलिसांनी पकडलेल्या सराईत गुंडाला पोलिसांवर आक्रमण करून त्याला पळून जाऊ देणारे भाजप माजी पदाधिकारी नारायण सिंह भदौरिया याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर भाजपने त्याला येथील दक्षिण जिल्हाध्यक्षपदावरून हटवले होते. या प्रकरणी अन्य ४ जणांनाही अटक करण्यात आली आहे.